_MPC_DIR_MPU_III

Pimpri: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकरण

ब्राह्मण जागृती सेवा संघ पिंपरी चिंचवड शहरातर्फे आयोजन

एमपीसी न्यूज – ब्राह्मण जागृती सेवा संघ पिंपरी चिंचवड शहरातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त सावरकर लिखित राष्ट्रभक्तीपर गीत सादरीकरणचा कार्यक्रम प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध युवा गायक सुयश खटावकर, अपर्णा वाठारकर-कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी ह्यांचे स्वागत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकित काणे, कांचन इनामदार व सहसचिव रोहन जोशी यांनी केले.

_MPC_DIR_MPU_IV

कार्यक्रमाचे वादक वैभव केसकर, सायली भिडे, सागर चव्हाण ह्यांचे स्वागत संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख आशिष जोशी, स्नेहल देशपांडे व पुणे जिल्हा अध्यक्षश्री निवास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. निवेदक रविंद्र खरे यांचे स्वागत पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तपन इनामदार यांनी केले. शशी बधे यांचे स्वागत कोषाध्यक्ष अतुल रेणावीकर यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II
  • सुयश खटावकर व समूह यांनी ‘ने मजसी ने, अनादी मी अनंत मी, जय देव जय देव जय जय शिवराया, जयोस्तुते, हे हिंदुशक्ती’ , नाट्यगीत ‘शतजन्म शोधताना’ ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या राष्ट्रभक्तीपर गीत सादरीकरणामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे निवदेक खरे यांनी सावरकरांचे निवेदनातून मांडले. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तपन इनामदार यांनी आभार प्रदर्शन केले. सुषमा वैद्य आणि सुजित कुलकर्णी यांनी ‘वंदे मातरम्’ म्हणुन कार्यक्रमाची सांगता केली.

  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश राजहंस, राजन लोणकर, परिक्षित कुलकर्णी, पंकज कंदलगावकर, गौरव मुळे, अभिषेक करवंदे, महेश देशपांडे, प्रसाद सराफ, प्रणव मुळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अमित नाडगौडा यांनी केले.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.