Pimpri : 39 व्या पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे बक्षिस वितरण

एमपीसी न्यूज –  39 व्या पुणे शहर व पिंपरी चिंचवड (Pimpri ) आयुक्तालय जिल्हा पोलीस क्रीडा  स्पर्धा 2023-24 चे 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन कऱण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे उप-कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते बक्षिस वितरण कऱण्यात आले.

या कार्यक्रमास माजी पोलीस महासंचालक प्रविण दिक्षित व दिक्षीत, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे रंजनकुमार शर्मा, अरविंद चावरिया तसेच पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

PMRDA : पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

या स्पर्धा शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे पार पडल्या. या मध्ये हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल व कबड्डी इत्यादी स्वरूपाचे सांघिक खेळ, त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वरूपाचे रनिंग, कुस्ती, ज्युडो, वेट लिफ्टिींग या खेळांचा समावेश होता.पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन, शाखा तसेच (Pimpri ) मुख्यालय येथे नेमणूकीस असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार स्पॉक खेळाडू तसेच संघाची निवड करण्यात आली होती.

स्पर्धेत उत्कृष्ट अँथलेटीक्स म्हणून पुरुष गटामध्ये विकास इंगळे तसेच महिला गटामध्ये यामीनी ठाकरे या स्पर्धकाची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे 100 मिटर चावण्याच्या स्पर्धेमध्ये पुरुषामध्ये विकास इंगळे पुणे शहर व महिलामध्ये यामीनी ठाकरे पिंपरी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पुरुषामध्ये शुभम दांडगे यांनी तसेच महिलांमध्ये रुपाली बंदीवाडेकर यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे सांघीक स्पर्धामध्ये सर्वसाधारण विजेतेपद मुख्यालय शिवाजीनगर या संघाने पटकाविले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी तर आभार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सह आयुक्त संजय शिंदे यांनी (Pimpri ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.