Dehugaon : भाषा प्रदर्शनास पालकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहू सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागाच्या Nursery ते UKG या वर्गांसाठी आयोजित ‘Magic of Letters’ भाषा प्रदर्शनाला पालकांचा प्रतिसाद ( Dehugaon) मिळाला.

मागील दोन वर्षांमध्ये पूर्व प्राथमिक विभागामध्ये ‘Pre Maths’ आणि ‘Science’ या विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘Magic of Letters’ या प्रदर्शनासाठी पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी अथक अशा परिश्रमातून वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण तसेच टाकाऊतून टिकाऊ, अगदी कमी खर्चातून तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्यांची निर्मिती यातून केली. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळू शकते.

Pimpri : 39 व्या पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे बक्षिस वितरण

या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे ‘चांद्रयान-3’ या मोहिमेवर आधारित बोलक्या बाहुल्यांचा खेळ (Puppet show)
तसेच विद्यार्थ्यांची प्रगल्भ शक्ती वाढावी यासाठी शिक्षकांच्या कौशल्यातून विविध प्रकारचे फ्लॅश कार्ड, लेसिंग कार्ड, स्टिक कार्ड, शब्दखेळ, सॅंड स्लेट अशा विविध प्रकारच्या अनेक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात ( Dehugaon) आली.

या प्रदर्शनासाठी सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष  सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, शाळेच्या प्राचार्या डॉ .कविता अय्यर, उपप्राचार्या  शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक यांची उपस्थिती होती. पालकांशी संवाद साधताना शाळेच्या प्राचार्या डॉ.कविता अय्यर मॅडम यांनी L.S.R.W. (Listen, Speaking, Reading, Writing) ही संकल्पना समजावून सांगत भाषेच्या विकासासाठी शाळेमध्ये घेतले जाणारे विविध उपक्रम किती महत्त्वपूर्ण आहेत यांची माहिती पालकांना दिली.

ही क्रमवार संकल्पना पालकांनी देखील घरी राबवली तर विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासास नक्कीच प्रेरणा मिळेल असा कानमंत्र त्यांनी पालकांना दिला. विद्यार्थी आणि पालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन  प्रदर्शनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका योगिता नांगरे ( Dehugaon) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.