Pimpri : महापालिकेच्या उद्यान, पर्यटनस्थळी माहितेचे फलक लावा; महापौरांची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यानामध्ये, पर्यटनस्थळी माहितीचे फलक लावणण्याची सूचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात विविध ठिकाणी उद्याने विकसित केली आहेत. महापालिकेची 175 उद्याने आहेत. त्यापैकी 41 उद्यानाची देखभाल महापालिका करते. तर, 112 उद्यानाच्या देखभालीसाठी खासगी संस्थांची नेमणूक केली आहे. तसेच शहरात अनेक ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन स्थळे, थोर व्यक्तींचे पुतळे आहेत. याठिकाणी विद्यार्थी, नागरिक येत असतात. त्यांना त्यांची संपूर्ण माहिती मिळणे अपेक्षित आहे.

त्यासाठी शहरातील नागरिक, पर्यटक, विद्यार्थ्यांना पशु, पक्षी, पर्यटन स्थळांची माहिती कळण्याच्या दृष्टीने उद्यानांमध्ये वन्य पशु, पक्षांची माहितीचे फलक, महत्वांच्या वनस्पतींच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत. त्याचबरोबर ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन स्थळांच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत, अशी सूचना महापौर जाधव यांनी प्रशासनाला केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.