Pimpri : नियोजित महापौर माई ढोरे यांना सव्वा वर्ष की नऊ महिने मिळणार संधी ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून माई ढोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. पुढील 27 महिन्याच्या कालावधीत तीन महिलांना संधी देण्याचे भाजपचे नियोजन आहे. नऊ महिने प्रत्येकाला संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नियोजित महापौर माई ढोरे यांना सव्वावर्ष की नऊ महिने संधी मिळणार याकडे इच्छुकांचे लक्ष आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता आलेल्या भाजपने पहिल्या अडीच वर्षात दोघांना महापौरपदाची संधी दिली आहे. पहिले सव्वा वर्ष च-होलीचे नितीन काळजे आणि दुसरे सव्वा वर्ष जाधववाडीचे राहुल जाधव यांना संधी दिली. काळजे यांना 16 महिने तर राहुल जाधव यांना 17 महिने संधी मिळाली. विधानसभा निवडणुकीमुळे जाधव यांना दोन महिने मुदतवाढ मिळाली होती.

आता दुस-या अडीच वर्षात पहिले सव्वावर्ष माई ढोरे यांनी संधी दिली आहे. पुढील 27 महिन्याच्या कालावधीत तीन महिलांना संधी देण्याचे भाजपचे नियोजन आहे. नऊ महिने प्रत्येकाला संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नियोजित महापौर माई ढोरे यांना सव्वा वर्ष की नऊ महिने संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपने पुढील 27 महिन्यात आणखीन तीन महिलांना संधी दिल्यास आणखीन दोन भाजपचे महापौर होणार असून पंचवार्षिकमध्ये भाजपचे पाच महापौर होत आहेत.

याबाबत बोलताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, “पुढील 27 महिन्याच्या कालावधीत महापौर पदावर जास्तीत जास्त जणांना संधी देण्यात येईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.