Pimpri : पिंपरी-चिंचवड स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते अपघाताबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते अपघाताबाबत जनजागृती करून ‘जागतिक स्मृती दिन’ साजरा करण्यात आला. रस्ते मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत असून आजवर अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले. अपघातात तरुणपिढीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यात सामाजिक संघटनाही स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान अध्यक्षा निर्मला जगताप यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वायत्त प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप प्रतिष्ठानच्या अंजली ब्रह्मे, किर्ती नाईक, सुरेखा वाडेकर, अनिता धाकरस, उदय वाडेकर, अशोक वाडेकर, अरुण जैन आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

दुचाकी, चारचाकी वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळावे, स्वत: गाडी चालवीत असताना अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी रस्ते अपघात जे मृत पावलेत त्यांना निगडी, चिंचवड, पिंपरी येथील चौकात मेणबत्ती पेटवून
आदरांजली वाहण्यात आली. तसेच वाहतुकीचे नियम पाळू याबाबत शपथ यांनी घेतली. अपघात हे प्रामुख्याने निष्काळजीपणामुळे व बेभान वर्तनामुळे होताना आढळतात. या व्यक्ती स्वतःबरोबरच इतर व्यक्ती तसेच समाजातील इतर घटकांवरही दुष्परिणाम करताना दिसतात.

अतिवेगाने वाहने चालवणे, मद्यपान सेवन करून वाहने चालवणे, विना हेल्मेट प्रवास करणे, सिट बेल्ट न लावणे, वाहन अपघातात खाजगी वाहने प्रामुख्याने प्रवाशांची काळजी घेणे, तसेच वाहन चालवीत असताना फोन वर बोलणे आदी
नियमांचे उल्लंघन सर्रास होताना दिसत आहे. यावर कडक कारवाई करण्याची आज होणे आवश्यक आहे. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप लोंढे आणि वरिष्ठ निरीक्षक खैरे पुढे म्हणाले की, वाहनांचा गती तसेच रेल्वे अपघातात अनेकजण मृत्यूमुखी
पडतात, यामध्ये पीडितांच्या नातेवाइकाना सोसावा लागतो. अनेकांचा संसार उघड्यावर येतो. यामध्ये जशी आपल्याला उन्हामध्ये छत्रीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपला कुटुंबप्रमुख देखील महत्वाचा भाग आहे असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.