Pune : पुणे महापालिका महापौर – उपमहापौर निवडणूक : शिवसेना-मनसे-एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष

एमपीसी न्यूज – आगामी पुणे महापालिका महापौर – उपमहापौर निवडणुकीत शिवसेना – मनसे – एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. येत्या 22 नोव्हेंबर रोजी या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार आहे. राज्यात शिवसेना – काँगेस – राष्ट्रवादी महाशिव आघाडीची चर्चा आहे. पण, अद्यापही महापालिकेत शिवसेनेची भूमिका ठरलेली नाही. वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी ‘एमपीसी न्यूज’ शी बोलताना सांगितले.

भाजप विरोधात महापालिकेत काँगेस – राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही पक्षाचे केवळ 61 नगरसेवक होतात. तर, भाजपकडे तब्बल 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे या पक्षाचा महापौर – उपमहापौर निश्चित मानला जात आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे.

भाजपने महापौर पदासाठी अभ्यासू नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना तर, उपमहापौर पदासाठी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतर्फे महापौर पाडस ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश कदम यांना तर, काँगेसतर्फे उपमहापौर पदासाठी चांदबी नदाफ शेख यांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे 10, मनसेचे 2 तर, एमआयएमचा 1 असे 13 नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची एकूण संख्या 164 आहे. यापूर्वी ही संख्या 162 होती. महापालिकेत 11 गावे समाविष्ट झाल्यानंतर 2 नगरसेवक वाढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.