Pune : पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी दोन महिलांना अटक; पुणे विमानतळ पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. हि घटना शनिवारी लोहगाव येथे घडली. जयश्री शिवाजी कोळी ( वय 26) आणि हिराबाई ऊर्फ बायडाबाई भानुदास खंडाळे ( वय 55, दोघेही राहणार -माईचा वाडा, कात्रज गाव, पुणे,) अशी अटक केलेल्या संशयित महिलांची नावे आहेत.

याप्रकरणी शिवाजी मुरलीधर चांदमाने (रा. प्राईड अशियाना सोसायटीजवळ, निंबाळकर नगर, लोहगाव, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजी मुरलीधर चांदमाने यांची पाच वर्षाची मुलगी राहत्या घरी खेळत होती. शनिवारी (दि. 16 रोजी) दुपारी ३.३०च्या सुमारास कोणीतरी आमिष दाखवून तिचे अपहरण केले आहे, अशी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास पथके नेमून सूत्रे हलविली. आणि अवघ्या आठ तासात याप्रकरणी दोन महिलांना अटक केली.

जयश्री शिवाजी कोळी ( वय २६) आणि हिराबाई उर्फ बायडाबाई भानुदास खंडाळे ( वय ५५, दोघेही राहणार -माईचा वाडा, कात्रज गाव, पुणे) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. मात्र, पोलिसांना तपासात पतीच्या भीतीपोटी स्वतःची मयत मुलगी जिवंत असल्याचे दाखविण्यासाठी एका महिलेने पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले.

यातील संशयित महिलेची मुलगी पाच वर्षाची सहा महिन्यापूर्वी मयत झाली होती. मात्र, हि बाब तिने पतीपासून लपवून ठेवली होती. ज्यावेळी पतीने मुलांना घेऊन सोलापूर येथे येण्यास सांगितले त्यावेळी त्या महिलेने भीतीपोटी एका मुलीचे अपहरण करून ‘हीच’ माझी मुलगी म्हणून पतीला दाखविण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.