Pimpri : रेल्वेच्या ट्रॅकमनकडे उत्पन्नापेक्षा कोट्यवधींची संपत्ती अधिक

सीबीआयकडून गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रेल्वेच्या सेवानिवृत्त ट्रॅक मेंटेनरकडे दोन कोटींपेक्षा जास्त ( Pimpri ) किमतीची संपत्ती उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. उत्पन्नापेक्षा जास्तीची संपत्ती असल्याने ट्रॅकमॅनच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मल्लीनाथ भीमाशंकर नोल्ला (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मल्लीनाथ हा रेल्वेच्या अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) विभागात ट्रॅक मेंटेनर होता. खडकी स्टेशन येथे कार्यरत असताना ऑगस्ट 2023 मध्ये तो सेवानिवृत्त झाला. लोकसेवक असताना मल्लीनाथ याने एप्रिल 2008 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:च्या तसेच कुटुंबिय आणि नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त प्रमाणात असल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले.

Pune : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विभावरी आपटे-जोशी यांना ‘दीदी पुरस्कार’ प्रदान

मल्लीनाथ याने मिळवलेल्या संपत्तीपैकी दोन कोटींपेक्षा जास्त किमतीची संपत्ती उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे समोर आले. मल्लीनाथ याला दोन पत्नी असून त्यांच्यासह त्याची मुलगी, मुलगा आणि सून यांचे उत्पन्नाचे साधन नाही. तरीही त्यांच्या नावाने मिळकत व वाहने खरेदी केली, असे तपासातून समोर आले. त्यानुसार सीबीआय एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

मल्लीनाथ याने 2008 ते 2023 या कालावधीत सर्वाधिक संपत्ती जमा केली. यात सहा फ्लॅट, सहा दुचाकी व एक चारचाकी अशी सात वाहने देखील खरेदी केली. त्याचप्रमाणे मोकळे प्लाॅट, जमीन, इमारत अशा काही मिळकतीही खरेदी केल्या. त्याचे वेतन आणि संपत्तीचे व्यवहार यात मोठी तफावत आहे. तसेच त्याने पगारातील मोठी रक्कम बचत केली असल्याचेही समोर आले आहे.

मल्लीनाथ नाेल्ला याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. त्यावरून चिंचवड पोलीस ठाण्याकडून तडीपार बाबतचा प्रस्ताव सादर केला ( Pimpri ) होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मल्लीनाथ नोल्ला याला एक वर्षासाठी तडीपार केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.