Pimpri : अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे शुल्क कमी करा – नाना काटे

एमपीसी न्यूज : महापालिकेने शहरातील (Pimpri) बांधकामांना परवानगी देताना आकारण्यात येणाऱ्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी चे दर कमी करावेत. नवीन महाराष्ट्र राज्य शासनाच्या आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक सुधारणा आदेशाची अंबलबजावणी करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, महापालिकेतर्फे शहरातील 45 मीटर व 45 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या बांधकामांना परवानगी देताना वार्षिक आग सुरक्षानिधी म्हणून जी अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी आकारण्यात येते ती जास्त आहे.

शहरातील बांधकाम व्यावसायिकांना व गृहरचना संस्थाना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. मुळात सद्यस्थितीत महापालिकेतर्फे आकारण्यात येणारी अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी ही ठाणे, पुणे, नाशिक यांच्यापेक्षा खूप जास्त आहे. यामध्ये मोठी तफावत आहे.

Akurdi : पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धा पियुष भोंडे ‘मोरया करंडक’चा महाविजेता

यामध्ये त्वरित सुधारणा करावी. यासंबंधी नुकताच (Pimpri) राज्य शासनाने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक फी सुधारणा हा आदेश 8 जून 2023 रोजी पारित केला आहे. त्याची अद्याप अंमलबजावणी देखील झालेली नाही.

फी संरचने यामध्ये सुधारणा करून या राज्य शासनाचा आदेशाची अंबलबजावणी करावी. शहरातील बांधकाम व्यावसायिकांना व गृहरचना संस्थाना फीच्या नावाखाली वर्षाला बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडातून सोडवावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.