Pimpri : दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आता रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला (Pimpri) पाणी पुरवठा करणारे पवना धरण पूर्णपणे भरले. तरी शहरवासीयांवर कृत्रिम पाणी टंचाई कशासाठी? दिवसाआड पाणीपुरवठा हा निर्णय रद्द करून दररोज पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली.

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात चांगल्या व मुबलक योग्य प्रमाणात पाऊस पडलेला असल्याने हि आपल्यासाठी आनंदाची बाब असताना देखील शहरवासीयांवर दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या नावाखाली कृत्रिम पाणी टंचाईची टांगती तलवार कशासाठी?

कटिबद्ध जनहिताय हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार शहरवासियांना योग्य सुविधा देणे व तसेच समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे.

परंतु, गेल्या तीन वर्षापासून प्रशासन व (Pimpri) पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी, नियोजन शून्य व भोंगळ कारभारामुळे धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असताना देखील शहरातील टँकर लॉबीला फायदा व्हावा.

PCMC : बालकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेचे मिशन ‘इंद्रधनुष्य’

या हेतूने महापालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणीचे कारण देत दिवसाआड पाणीपुरवठा हा पाणी कापतीचा निर्णय घेवून शहरात कृत्रिम टंचाई निर्माण केलेली आहे.

याचा शहरातील नागरिकांना नाहक त्रास होत असून शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हि खूप गंभीर बाब असून, म्हणून याचा विचार करता त्वरित दिवसाआड पाणीपुरवठा हा निर्णय रद्द करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात दररोज व पुरेशा दाबाने योग्य प्रमाणत पाणी पुरवठा करावा. कृत्रिम पाणी टंचाईचे संकट दूर करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.