Pimpri : भारतीय संविधान जाळल्याच्या निषेधार्थ आरपीआयकडून निषेध

एमपीसी न्यूज – दिल्ली येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या होत्या. याबातच व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओ मधून जमावाकडून संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी घोषणा देत असल्याचे निदर्शनास आले होते.

या घटनेचा निषेध व्यक्त करीत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झालेल्या निषेध आंदोलनात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, सुरेश निकाळजे, बाळू भागवत, बाळासाहेब रोकडे, युवक अध्यक्ष प्रणव ओव्हाळ, पिंपरी-चिंचवड युवा अध्यक्ष केतन कांबळे, चिंचवड विधानसभा युवा अध्यक्ष यशवंत सूर्यवंशी, मनोज जगताप, भूषण डोईगज, अजय झुंबरे, सुशील कांबळे. अजिज शेख, ज्येष्ठ नेते लक्ष्मण गायकवाड, डॉ. के. एम. बुक्कर, सिकंदर सूर्यवंशी, शुभम शिंदे, चंद्रकांत ओव्हाळ. राहूल रोकडे, पिंपरी विधानसभा युवक सरचिटणीस राम शिरोळे, दशरथ ठाणांबीर आदी उपस्थित होते.

‘मनुस्मृती जाळणा-यांचा धिक्कार असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘भारतीय संविधानाचा विजय असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.