Pimpri : प्लॅस्टिक वापरणा-यांकडून आठ हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 24 डांगे चौक येथील पाच दुकानांची तपासणी करून एका दुकानदाराला प्लॅस्टिक वापरण्याबाबत 5000 हजार दंड केला. तसेच दोन किलो प्लॅस्टिकही जप्त केले. याचबरोबर रस्त्यावर साहित्य ठेवण्यात कामी एका दुकानदारास 3000 हजार रुपये दंड आकारण्यात आला, असे एकूण मिळून 8000 हजार रुपये प्रशासकीय दंड वसूल केला.

ही कारवाई आरोग्य निरीक्षक शांताराम माने, स्वदेश साळुंखे, प्रशांत पवार, वजीर सौदागर यांनी केली. हि कारवाई प्रभाग अधिकारी स्मिता झगडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक बेद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.