Pimpri: ‘एचए’च्या कामगारांचे प्रश्न सोडवा; निवृत्त कामगारांचे पंतप्रधान यांना साकडे

एमपीसी न्यूज – हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए)कंपनीच्या कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडवून त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे साकडे कंपनीचे निवृत्त कामगार, माजी सैनिक लक्ष्मण रुपनर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहेत.

एचए कंपनीच्या कामासाठी, तेथील कामगारांच्या वेतनासाठी केंद्रातील मोदी सरकारने 134 कोटी रुपये दिले आहेत, याची जाणीव कामगारांना आहे. परंतू, गेल्या दोन वर्षांपासून पगार मिळत नसल्यामुळे कामगारांची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे. सन 1959 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीच्या कामगारांची बिकट अवस्था असून त्यांच्या कुटुंबियांना जगण्यासाठी झगडावे लागत आहे. पगारच नसल्यामुळे विविध दैनंदिन गरजा भागविताना कामगार कुटुंबियांच्या नाकीनऊ येत आहे.

  • कामगारांच्या मुलांचे हाल होत असून सर्वांचेच भवितव्य अंध:कारमय झाले आहे. अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. या त्रासाला कंटाळून ‘एचए’तील एका कामगाराने आत्महत्या केली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करता कामगारांना वेतन द्यावे. तसेच आजी-माजी कामगारांचे फंड, अन्य रक्कम त्यांना त्वरीत देण्यात यावे आणि इतर प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रुपनर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.