Pune : जलसंधारणमंत्र्यांचे घर पोखरणाऱ्या खेकड्याना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडले

एमपीसी न्यूज- राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी खेकड्यानी आज, मंगळवारी धुमाकूळ घालत त्यांचे निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या ठिकाणी तातडीने धाव घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या खेकड्याना पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे मोठे नुकसान टळले. अलीकडेच कोकणात तिवरे धरण खेकड्यानी पोखरल्यामुळे फुटले असे वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्याचा निषेध करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या निवासस्थानासमोर खेकडे सोडून अनोखे आंदोलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.