Pimpri : विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे – विजयकुमार माळपूरे

एमपीसी न्यूज – देशातील होतकरू तरुण नव उद्योजकांना (Pimpri) प्रोत्साहन, मार्गदर्शन तसेच उद्योगशीलता वाढीसाठी डॉ. विक्रम साराभाई कौशल्य विकास केंद्राने अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम व्यावसायिक शिक्षणाच्या भविष्यातील बदलांची गरज ओळखून तयार केले आहेत. ज्यामुळे शैक्षणिक आणि उद्योग वर्गांमध्ये शिक्षणाचा विचार आणि उद्योगाची आवड निर्माण होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन डॉ. विक्रम साराभाई कौशल्य विकास केंद्राचे संचालक विजयकुमार माळपूरे यांनी केले.

Talegaon : पुर्ववैमनस्यातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

देशात उत्कृष्ट व्यवसायिक कौशल्य विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉ. विक्रम साराभाई कौशल्य विकास केंद्र आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. पीसीयुच्या साते, मावळ येथील मुख्यालयात प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी आणि डॉ. माळपूरे यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी (Pimpri) पीसीयुचे सल्लागार हुसेन हाजीते उपस्थित होते.

या व्यवसायिक अभ्यासक्रमाचा पीसीयुच्या विद्यार्थ्यांना फायदा होऊन अधिक व्यवसायिक कौशल्य आत्मसात करण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यातील उद्योजक तयार होतील आणि देशाच्या औद्योगिक, आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वास डॉ. गिरीश देसाई यांनी व्यक्त केला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.