Talegaon : पुर्ववैमनस्यातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाच्या (Talegaon) अंगावर गाडी घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री पुणे-मुंबई जुना महामार्गावरील मयुर हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली.  

विशाल बाळासाहेब मोकाशी (वय 30 रा. सांगवडे, मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महेश दिलीप लोहोर (वय 29 रा. दारुंब्रे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

Maval : दिवंगत पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा; समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास गराडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात आधी वाद झाला (Talegaon) होता. याचाच राग मानात धरून आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडी फिर्यादी यांच्या अंगावर घालून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादींना फरफटत नेले. यात फिर्यादी व त्यांचा मित्र मंगेश सावंत हे गंभीर जखमी झाले. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.