Maval : दिवंगत पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा; समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास गराडे

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ (Maval) येथील दिवंगत पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळा 1 मे 2024 रोजी होणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास गराडे यांची तर कार्यक्रम प्रमुखपदी अरुण वाघमारे व कार्याध्यक्षपदी बाळासाहेब तुमकर यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन व नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी विलास दंडेल,राजेंद्र वहिले,अर्जुन ढोरे,गणेश विनोदे, अतुल राऊत, काशिनाथ भालेराव, सुनील शिंदे,विवेक गुरव,सदाशिव गाडे,शंकर ढोरे,अजय धडवले,शरद ढोरे,सोमनाथ धोंगडे,खंडू काकडे, महेश तुमकर,गणेश ढोरे,अक्षय बेल्हेकर,विनायक लवंगारे,संजय दंडेल,गणेश झरेकर,कार्तिक यादव, सुधीर ढोरे,सतीश गाडे,सुहास विनोदे, विकी ढोरे,अतुल ढोरे आदी उपस्थित होते.

Chinchwad : एस बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये उद्योजकता कार्यशाळा

यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा 1 मे 2024 रोजी संपन्न होणार असून, यामध्ये सर्व जाती धर्मातील जोडप्यांचा समावेश असणार आहे. तसेच,जोडप्यांना संसारोपयोगी भांडी, लग्नाचा पोशाख, साड्या, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन, नवरदेवाची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. 10 एप्रिल पर्यंत जोडप्यांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून, नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा उपक्रम गेली दहा वर्षांपासून राबविण्यात येत असून सुमारे 165 जोडपी विवाहबद्ध झाले आहेत.

सामुदायिक विवाह सोहळा समिती नूतन (Maval) कार्यकारिणी :अध्यक्ष – रोहिदास गराडे, कार्यक्रमप्रमुख- अरुण वाघमारे, कार्याध्यक्ष – बाळासाहेब तुमकर, उपाध्यक्ष – नंदकुमार ढोरे, योगेश वाघवले, सचिव – संभाजी येळवंडे, सहसचिव अभिजित ढोरे खजिनदार – अनिल कोद्रे, सहखजिनदार – संतोष निघोजकर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.