HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षांचे हॉल तिकीट 22 जानेवारी पासून मिळणार

एमपीसी न्यूज – बारावीच्या परीक्षांचे प्रवेशपत्र (HSC Exam Hall Ticket) सोमवार (दि. 22 जानेवारी) पासून मिळणार आहेत. हे प्रवेशपत्र ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवारी college login मध्ये download करण्याकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याच्या सूचना माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

Maval : दिवंगत पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा; समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास गराडे

महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्याथ्यर्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र (Hall Ticket) उघडताना काही त्रुटी (Error) आल्यास सदर प्रवेशपत्र Google Chrome मध्ये उघडावे. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही शिक्षण मंडळाच्या सूचना आहेत.

प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक /प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले आहे.

प्रवेशपत्र विद्याथ्यर्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून पुनःश्च सात प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास दिले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.