Chinchwad : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मकर संक्रांत उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात  (Chinchwad ) सर्व महिला शिक्षिकांनी एकत्र येऊन मकर संक्रांत उत्साहात साजरी केली. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला शिक्षिकांनी संस्कृतीचा वारसा जपत हळदीकुंकू व वाण देऊन कार्यक्रमाचा आनंद व्दिगुणित केला.

विद्यार्थ्यांना ज्ञानार्जना बरोबर संस्कृतीचा वारसा जपण्याची प्रेरणा मिळावी, विविध सणांची माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला शिक्षकांबरोबर अनेक महिला पालकांनी देखील सहभाग नोंदविला.

Maval : दिवंगत पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा; समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास गराडे

प्रा. सुनीता गायकवाड आणि सहकारी शिक्षिका यांच्या सुबक रांगोळीने  (Chinchwad) कार्यक्रमाला शोभा आली. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वैशाली देशपांडे, प्रा. स्नेहल साळवी, प्रा. विजया चौधरी, डॉ. सुनिता पटनाईक यांनी केले. या कार्यक्रमास उपप्रचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, महिला शिक्षिका व शिक्षकेत्तर महिला कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.