Chakan : शॉपचे पत्रे उचकटून रोख रक्कम, लॅपटॉप व मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – पॅकेंजीग कंपनीचे (Chakan) शॉपचे पत्रे उचकटून चोरांनी त्यातून रोख रक्कम, मोबाईल व लॅपटॉप चोरून नेले आहेत. ही चोरी बुधवारी (दि.17) रात्री ते गुरुवारी (दि.18) सकाळी या कालावधीत बिरदवाडी,आंबेठाण येथील प्रथमेश पॅकेंजीग कंपनी शॉपमध्ये झाली आहे.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात ईश्वर नामदेव सावंत (वय 35 रा.बिरदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे – विजयकुमार माळपूरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दुकान बंद असताना चोरांनी पत्रे उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी लोखंडी कपाटाचा दरवाचा उचकटून त्यातील रोख 15 हजार रुपये, 20 हजार रुपयांचा लॅपटॉप, 10 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण 45 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास (Chakan) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.