Pimpri : आर्थिकदृष्टया समृध्द होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्या – शंकर जगताप

एमपीसी न्यूज –  असंघटित क्षेत्रातील कामगारांना केंद्र व (Pimpri )राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून संरक्षण दिले जात आहे. बांधकाम कामगार बांधवांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.
या योजनांमधून कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच( Pimpri )आरोग्यविषयी लाभ दिले जात असून, आर्थिकदृष्टया समृध्द होण्यासाठी मोदी सरकारच्या  योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

बांधकाम कामगार श्रमिक सेना यांच्या मार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मिळणाऱ्या संसारी भांड्यांचे वाटप पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थित बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. खराडवाडी येथे शुक्रवारी भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कामगार आघाडीचे सदस्य दिपक म्हेत्रे आणि त्यांच्या सहकारी कांचन वाघमारे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमावेळी, दोन हजारहून अधिक नोंदणीकृत बांधकाम मजूर यांना संसारासाठी उपयुक्त कुकर, पाण्याची टाकी, ताटे, चमचे, ग्लास, वाट्या, पातेले, सुरी, पक्कड, पळी, डबे इत्यादी प्रकारची भांडी शासनाच्या योजनेतून मोफत स्वरूपात देण्यात आली.

Pune : कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ मंगळवारी

यावेळी लाभार्थी बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. यावेळी, भाजप वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे यांच्यासह बांधकाम कामगार श्रमिक सेना अध्यक्ष दीपक म्हेत्रे, सचिव कांचन वाघमारे, सदस्य कांताताई कांबळे, मालन गायकवाड, संदीप कांबळे, महामानव एक्स्प्रेस असंघटिक कामगार संघटनेचे अध्यक्ष गिरीश साबळे आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागीर आणि कारागीरांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे आणि त्यांनी तयार केलेली स्थानिक उत्पादने, कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून भारताची परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवणे यावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्य शासनाने यांनी भर दिला आहे.

या योजनेद्वारे, गुणवत्ता, सुधारणा आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर या उत्पादनांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याची व्याप्ती वाढविली जाईल. सरकारने या योजनेत 18 पारंपरिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात उपस्थित कारागीर आणि कारागीरांना मदत होईल.
यामध्ये सुतार, होडी बनवणारे, लोहार, कुलूप, सोनार, मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार, शिल्पकार, गवंडी, माशांचे जाळे बनवणारे, खेळणी बनवणारे आणि इतरांचा समावेश असल्याचे सांगत केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन गोरगरीब लोकांसाठी कशा पद्धतीने काम करत आहे, कोणकोणत्या योजना राबवत आहे, याबाबत देखील शंकर जगताप यांनी माहिती दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.