Pune : कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ मंगळवारी

एमपीसी न्यूज – गेली 36 वर्षे अखंडीत यशवंतराव चव्हाण (Pune)जयंतीनिमित्त स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केला जात आहे.

यंदाही हे कविसंमेलन(Pune) मंगळवार, दि. 12 मार्च 2024 रोजी रात्री 9.00वा. टिळक स्मारक मंदीर, टिळक रोड, पुणे येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, राजा दीक्षित (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ), आमदार सुनिल टिंगरे, प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

 

· कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ कला जीवन गौरव पुरस्कार – विलास रकटे (ज्येष्ठ मराठी अभिनेते) – रोख रु. 25,000/ व मानचिन्ह

·कै. शिवाजीराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – अनिल धाकू कांबळी (कणकवली), कविता संग्रह – इष्टक – रोख रु.11,001/व मानचिन्ह

·कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – भीमराव धुळूबुळू (मिरज) कविता संग्रह – काळजाचा नितळ तळ – रोख रु.11,001/व मानचिन्ह· कै. धनाजी जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – गीतेश गजानन शिंदे (ठाणे) – कविता संग्रह – सीसीटीव्हींच्या गर्द छायेत – रोख रु. 11,001/-

 

Vadgaon Maval : महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज, जाखमाता देवी भाऊ बहिण भेट

 

हे पुरस्कार 12 मार्च रोजी होणार्‍या कवि संमेलनात देण्यात येणार आहेत. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन रामदास फुटाणेे, अशोक नायगावकर हे करणार आहेत, असे रामदास फुटाणे, विजय ढेरे, संजय ढेरे, गौरव फुटाणे यांनी जाहीर केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.