Baramati : सुप्रिया सुळे यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची गळाभेट

एमपीसी न्युज-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Baramati)उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात बारामती लोकसभा मतदारसंघातून लढत होणार असल्याच्या चर्चा आहे. आता दोघींनी गळभेट घेतली आहे.

बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदीरात दर्शनासाठी गेल्या असता दोघी सामोरा समोर आल्या त्यावेळी त्यांनी ही गळाभेट घेतली.

खासदार सुप्रिया सुळे (Baramati)आणि सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. शरद पवार गटाने सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली असून दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारच अजित पवार गटाच्या उमेदवार असतील असे जाहीर केले आहे.

 

Vadgaon Maval : महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज, जाखमाता देवी भाऊ बहिण भेट

सुप्रिया सुळे या गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत एकमेकांसमोर असणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.