-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri: टाटा नेक्सॉन भारतात सुरक्षिततेसाठी सर्वोत्कृष्ट

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ग्लोबल एनसीएपी (आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन गाड्यांची चाचणी) या काम करणा-या संस्थेने सुरक्षिततेच्याबाबत इतर वाहनांच्या तुलनेत टाटा नेक्सॉन या वाहनाने जास्तीत-जास्त गुण पटकाविले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नवीन गाड्यांची चाचणी कार्यक्रम (ग्लोबल एनसीएपी) कडून वाहनाच्या सुरक्षिततेबाबत चार स्टार देण्यात आले. नवीन गाड्यांची चाचणी कार्यक्रमाद्वारे भारतीय बाजारपेठेतील परीक्षण केलेल्या सर्व इतर वाहनांच्या सुरक्षिततेबाबत (13.56/ 17.00) इतके गुण देण्यात आले आहेत.

टाटा मोटर्सने अभिमानाने घोषणा केली की, नेक्सॉन ग्लोबल एनसीएपीद्वारे चार स्टार रेटिंगसह प्रमाणिक केली गेली आहे. नवीन वाहनांच्या सुरक्षेचे मूल्यमापन करण्याकरिता जागतिक पातळीवर ही संस्था वाहनाच्या सुरक्षिततेबाबत स्टार रेटिंग देते. ग्लोबल एनसीएपीने नुकत्याच काढलेल्या सुरक्षेच्या परिक्षणात असे सूचविले आहे की, नेक्सॉन भारतीय बाजारातील सर्व मॉडेलच्या परिक्षणात सर्वात जास्त सुरक्षिततेसाठीचे (13.56/17.00) गुण मिळवले. या लेव्हल नेक्स कामगिरीसह, नेक्सॉन आता केवळ सर्वात सन्मानित कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून भारतातील सुरक्षिततेसाठी देखील गाडीला उच्च रेटिंग प्राप्त झाले आहे.

टाटा मोटर्सचे पीव्हीबीयूचे प्रेसिडेंट मयांक पारीख यांनी सांगितले की, जागतिक एनसीएपी परिमाण हे तंत्रज्ञानाच्या दृष्ट्या प्रगत वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब आहेत. जे सुरक्षित आणि आल्हाददायक आहेत. टाटा मोटर्सच्या पीव्ही उत्पादनांपैकी सर्वात सुप्रसिद्ध मॉडेलपैकी एक असल्याने या परीक्षणात नेक्सॉन भारतातील सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. हे आजच्या आमच्या सर्व नेक्सॉन ग्राहकांसाठी गर्व वाटावा असा क्षण आहे. संपूर्ण टीमने केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल मला आनंद झालेला आहे व अभिमानही आहे. यासाठी मी प्रत्येकाचे अभिनंदन करतो. सर्वोत्तम गुणवत्तायुक्त उत्पादने बाजारपेठेत देण्यासाठी आम्ही आमचा प्रवास सुरु ठेवलेला आहे.

टाटा नेक्सॉन सुरक्षित एसयूव्ही म्हणजे काय?

टाटा नेक्सॉन हे वाहन कोणत्याही प्रकारची बाह्य ताकद व त्यापासून वाहनाचे संरक्षण, उच्च शक्तिचे स्टील व मजबूती असलेले व बाहेरील धक्यापासून प्रभावीपणे उर्जा शोषून घेते आणि वाहनाच्या आतील प्रवासी विभागात संरक्षण देताना बाह्य ताकदीचे योग्य प्रकारे विभाजन करते.

ड्रायव्हर आणि प्रवासी सुरक्षेसाठी नेक्सॉन गाडीत दोन एअरबॅब्ज आणि उत्कृष्ट सीट बेल्ट आणि धक्यामुळे सीट पुढे सरकू नये यासाठी तयार केलेली असून ती प्रवाशांचा बचाव करते आणि दुखापत टाळते. दुदैवाने अपघात झाल्यास वाहन चालकाच्या पायाजवळील जागा अत्यंत सुरक्षित असल्यामुळे पायाच्या दुखापती होत नाहीत.

वाहनाची बांधणी व नेक्सॉन वाहनामध्ये सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा म्हणजेच एबीएसची सुविधा, लहान मुलांसाठी आसन, लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी दरवाज्यांना लॉक, आवाजावर आधारित सुरक्षा यंत्रणा, पुढील फॉग दिव्यांची सुविधा यामुळे हे वाहन रस्त्यावर चालवताना सर्व पातळ्यांवर सुरक्षितता मानकांचा ओतप्रोत वापर केलेला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.