Pimpri : जेनेरिक औषधांच्या पाकिटांवर विशिष्ट रंगसंगती करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – आपल्या सरकारकडून जेनेरिक औषधांच्याबाबती रंगसंगती आणल्यास रुग्णांना या जेनेरिक औषधे आहेत, हे ओळखणे सोपे जाईल. म्हणून सरकारडून जेनेरिक औषधांच्या पाकिटांवरील रंगसंगतीबाबत विचार व्हावा, अशी मागणी चिंचवडमधील चिन्मय कवी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री प्रकाश नड्डाजी यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

सध्या वैद्यकीय सेव महाग होत चालली आहे. विशेषत: औषधांच्या किंमती भरमसाट वाढत आहेत. त्यामुळे रुग्णांचे जगणे कठीण होत आहे. रुग्णांनी ब्रॅंडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे घेतल्यास त्यांचे पैसे मोठ्या प्रमाणावर वाचू शकतात. मात्र, ही औषधे घेण्यापूर्वी कशी ओळखावीत याबाबत चिंचवडमधील चिन्मय कवी यांनी या मागणीबाबत आरोग्य मंत्र्याकडे विचाराणा केली आहे.

  • देशात स्वस्त औषधे मिळतात का? का नागरिका त्या औषधांची खरी किंमत ओळखू शकतो का? जेनेरिक औषध ओळखण्याचे परिमाण सरकारच्याजवळ आहे काय? या सगळ्यांची उत्तरे फक्त “नाही “असेच आहे. त्यासाठी जेनेरिक औषधे ओळखण्यासाठी त्याच्या रंगसंगतीत बदल करावा. तरच ती सर्वसामान्य नागरिकांना ओळखता येतील.

सील बंद अन्नावर सरकारी नियमांनुसार शाकाहारी किंवा मांसाहारी याबाबतची माहिती चिन्हांद्वारे दिलेली असते. त्यामुळे अन्नांचा प्रकार लक्षात येतो. तसेच जेनेरिक औषधांबाबत रंगसंगती केली तर सर्वसामान्य नागरिकांना ओळखणे सोपे जाईल असे ही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.