Pimpri : जनतेशी नाळ जोडलेला माणूस म्हणजे श्रीरंग बारणे – संतोष पवार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांशी जनसंपर्क असलेला, मावळच्या मातीशी नाळ जोडलेला माणूस म्हणजे श्रीरंग बारणे. असे मत पुनावळे येथील कार्यकर्ते संतोष पवार यांनी व्यक्त केले.

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी पुनावळे गाव येथे प्रचार दौरा केला. पुनावळे येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गावाच्या चावडीवर गावातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी चर्चा केली. यावेळी कार्यकर्ते संतोष पवार बोलत होते.
यावेळी चेतन भुजबळ, सुनील ढवळे, सुरेश रानवडे, निवृत्ती नाना भुजबळ, नगरसेविका रेखा दर्शीले, विजय दर्शीले, सुरज मुळीक, सुदाम पांढरे, सुरेश दर्शीले, धनाजी कोयते, सरपंच गणेश गायकवाड, मुरलीधर बोरगे, तानाजी शिंदे, पांडूरंग दर्शीले, सारिका, पांढरे ग्रामस्थ आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • संतोष पवार म्हणाले, “खासदार श्रीरंग बारणे सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असतात. त्यांचे कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व उत्तम आहे. त्या जोरावर त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे नाव देशाच्या संसदेत गाजवले आहे. मावळ परिसराला विशिष्ट नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यांच्या काम करण्याच्या उत्तम शैलीसाठी देशाच्या संसदेत त्यांचा सलग पाच वेळा संसदरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

खासदार बारणे यांच्या सर्वमान्य नेतृत्वाविषयी बोलताना पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने पुनावळे येथील ग्रामस्थांसाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेतली. त्याउलट महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गावातील नागरिकांशी चर्चा करत, तसेच ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेत आपली प्रचार सभा घेतली.

  • सतत आपल्या सोबत वावरणारा उमेदवार आपल्याला भेटण्यासाठी आला असल्याने पुनावळेकर आनंदून गेले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेण्यापेक्षा आपल्या गावच्या पारावर आपल्या उमेदवाराशी आपुलकीने संवाद साधणे इथल्या नागरिकाला संयुक्तिक वाटते. त्यामुळे इथला सर्व मतदार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मागे उभा राहणार आहे, असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.