Pimpri: महापौरांच्या नातवाचे सामाजिक दातृत्व; वाढदिवसाचा खर्च टाळून ‘कोरोना’ लढाईसाठी केली मदत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग लक्षात घेऊन सामाजिक दातृत्वाच्या भावनेने महापौर उषा ढोरे यांचा नातू ज्ञानेश ढोरे याने स्वत:च्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळला आहे. तो खर्च कोरोना रुग्णांवरचे उपचार, त्यासाठीची औषधे आणि इतर सामुग्री अशा सगळ्याच गोष्टींसाठी महापालिकेस 51 हजार रुपयांची मदत केली आहे.

घरातूनच समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या ज्ञानेश याने सामाजिक गरज ओळखून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करत कुटुंबाचा वारसा पुढेही चालविला आहे. ज्ञानेश याचा आज 13 वा वाढदिवस होता.

त्याने स्वत:च्या वाढदिवशी होणारा अनावश्यक खर्च टाळून कुटुंबियांसमवेत अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.

_MPC_DIR_MPU_II

सध्या देश आणि जगासमोरचे कोरोना व्हायरसचे संकट हे मानवते समोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज लक्षात घेता ज्ञानेशकडून महापालिकेस देण्यात आलेली आर्थिक मदत प्रशंसनीय आहे. त्याचबरोबर समाजातील इतरांसमोर आदर्श निर्माण करणारी आहे.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महापौर दालनात आज ज्ञानेश याने महापौर उषा ढोरे, वडील जवाहर ढोरे, गणेश काचे यांच्या उपस्थितीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे आर्थिक देणगीचा धनादेश सुपूर्द केला.

ज्ञानेश याने दानशूरतेचा नवा आयाम समाजासमोर उभा केला असून त्याची कृती आदर्शवत आणि अनुकरणीय असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.