Pimpri: खराळवाडीसह ‘ही’ 15 ठिकाणे ‘क्लस्टर कंटेन्मेंट झोन’ मधून बाहेर

These 15 places including Kharalwadi are out of the cluster containment zone

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले होते. हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. त्यामुळे खराळवाडीसह 15 ठिकाणे ‘क्लस्टर कंटेन्मेंट’ झोन म्हणून सील करण्यात आला होती. आता या भागातील रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे खराळवाडीसह 15 ठिकाणे ‘क्लस्टर कंटेन्मेंट’  मधून बाहेर आली आहेत. आता त्या परिसरातील काही भाग कंटेन्मेंट झोनमध्ये असणार आहेत.

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी- चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे.

तसेच जागतिक आरोग्य संघटना तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रस्तावित केलेल्या विविध उपाय योजनांची अंमलबजावणी या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्यात आली आहे.

त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.

शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन खराळवाडीसह 15 परिसर  ‘क्लस्टर कंटेन्मेंट’ झोन म्हणून सील करण्यात आला होता. या भागातील रुग्ण हे बरे झाले आहेत.

कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे Cluster Containment Zone म्हणून सील करण्यात आलेल्या परिसराचा आदेश निरस्त करण्यात आला आहे.

 हा भाग कंटेन्मेंट झोन

खराळवाडी  :– शिवम रेडियिम, मयुर सुपर मार्केट, स्वरामई गार्डन, युको बँक ब्रँच, मुंबई पुणे हायवे, बॅक ऑफ बडोदा एटीएम, हॉटिल क्रिस्टल कोर्ट, शिवम रेडियम

फुगेवाडी:-  परिसर महा ई सेवा केंद्र, पुणे मुंबई हायवे, श्रध्दा बेकरी, आझाद हिंद मंडळ, भारत बेकर्स, जयहिंद प्रोव्हीजन स्टोअर्स, अल कादरी केटर्स, श्री स्वामी समर्थ मंदिर , एस.बी.एम.टॉयलेट, महा ई सेवा केंद्र

साई पॅराडाईज, पिंपळे सौदागर :- साई साहेब सोसायटी शेजारी, अंतर्गत रस्ता, अंतर्गत रस्ता, न्यु पूना बेकरी, शिव साई लेन रोड, साई साहेब सोसायटी शेजारी

संभाजीनगर :-  तुळजाभवानी मंदिर, बालेश्वर कॉ.ऑ.हौ.सोसासटी, अम्रेला गार्डन, श्री सिध्दीविनायक मंदिर, व्हिजनमार्क बायोटेक, बर्डव्हॉली तलाव, महात्मा फुले कॉलेज, साकेत हौसिंग सोसायटी, शिवम मेडिकल, डिश ऑफिस, सुबोध विद्यालय, तुळजा भवानी मंदिर

अमृतधारा, दिघी : विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर, अर्जुन जिम, ओयो होम, जेनेसिस च-होली समोर, आळंदी रोड, ममता स्वीट्स , विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर

ज्ञानंगगा सोसयटी, रहाटणी : श्री गार्डन टी स्पॉट , निर्मल बंगला , आर.आर.जी.२ सोसायटी रोड, रॉयल रहार्डका ग्रीन्स फेज २, रॉयल ऑरेंज कांऊटी रोड, ज्ञानगंगा सोसयटी रोड, श्री गार्डन टी स्पॉट

श्रीकृष्ण कॉलनी,रहाटणी :- हरिकृपा दुध डेअरी, काळेवाडी रहाटणी रोड, श्रेया मेडिकल, दत्त मंदिर, गुरुकृपा ट्रेडिंग, हरिकृपा दुध डेअरी

छत्रपती चौक, रहाटणी : श्रीनंदा क्लासिक, सिध्दीविनायक मंदिर, रेणुका माता मंदिर, बसेरा रेसिडन्सी, ओंम मेडिकल स्टोअर, जीवन क्लिनीक, छत्रपती चौक, श्रीनंदा क्लासिक

हनुमान कॉलनी,भोसरी :– फॅन्सी काम्प्युटर पेरिफेरल्स, दुर्गामाता मंदिर, राजगुरु बँक समोर, फॅन्सी काम्प्युटर पेरिफेरल्स

अलंकापुरम रोड, वडमुखवाडी : श्री समर्थ गॅरेज, शिवराज ग्रीन टेक, अंलकापुरम रोड , नील मोटर्स, श्री समर्थ गॅरेज

आकाशराज हौसिंग सोसायटी, रावेत :- वास्तु इंपेरियल समोर, औंध रावेत बीआरटी रोड, श्री गणेश एंटरप्राईज कंपनी लि., वास्तु रिव्हर नेस्ट समोर , वास्तु इंपेरियल समोर

वाल्हेकरवाडी :– इंपेरियल हाईट्स समोर, एच.डी.एफ.सी. बँक एटीएम, महालक्ष्मी मेडिकल, जीजामाता चौक, स्वरा मेडिकल, रेनुका अपार्टमेंट, सिल्वर अक्षय सोसायटी समोर, डी.वाय.पाटील कॉलेज मागील बाजु, इंपेरियल हाईट्स समोर

शरदनगर, चिखली :– स्वामी समर्थ अपार्टमेंट, स्वामी स्नेह, चिट्टे पॅलेस, सिध्दी रेसिडन्सी, स्पाईन रोड, निदान हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, स्वामी समर्थ अपार्टमेंट

गणेशम सोसायटी, पिंपळे सौदागर :– गणेशम सोसायटी ,गणेशम फेज १, मयुरेश्वर रोड, वाघव्हिला, गणेशम सोसायटी, गणेशम सोसायटी,

बालघरे वस्ती, चिखली :– सार्थक सुपर मार्केट, भैरवनाथ जनरल स्टोअर, शेतीचा भाग, वत्सला एंटरप्रायजेस, सार्थक सुपर मार्केट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.