New Delhi : ‘ED’च्या पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील कार्यालय सील

Five ED officers infected with corona, seals office in Delhi

एमपीसी न्यूज – दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या सक्तवसुली संचालनालयाच्या ED मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ED च्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काल, शुक्रवारी ED च्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले.

उद्या रविवारपर्यंत हे कार्यालय सील असणार आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.