Pune: हवेली तालुक्यातील ‘या’ गावांमधील नागरिकांना पुणे, पिंपरी पालिका क्षेत्रात ये-जा करण्यास 12 जूनपर्यंत मनाई

Citizens of 'This ' villages in the Haveli Taluka are not allowed to come and go in Pune, Pimpri Municipal Area till June 12

एमपीसी न्यूज – हवेली पंचायत समिती कार्यक्षेत्रातील मांजरी बुद्रूक, कदमवाकवस्ती, न-हे आणि वाघोलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत. त्यामुळे या भागातील नोकरदारांसह सर्वांना आजपासून पुणे, पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रात ये-जा करण्यास मनाई केली आहे.

याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी काढले आहेत.  आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रूक, कदमवाकवस्ती, न-हे आणि वाघोलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत. या गावातील नागरिक नोकरीसाठी पुणे, पिंपरी महापालिका हद्दीत ये-जा करत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यासाठी या गावातील पुणे, पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रात ये-जा करणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी, नर्स,  डॉक्टर्स,  औषधी कंपन्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांवर काही बंधने आणणे आवश्यक आहे.

मांजरी बुद्रूक, कदमवाकवस्ती, न-हे आणि वाघोली या चार गावातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या विचारात घेता.

पुणे, पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रात ये-जा करणा-या गावातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, व्यावसायिक, मजूर यांनी आजपासून 12 जून पर्यंत कामाच्या ठिकाणाहूनच काम करावे. अथवा स्वत:च्या घरुन विलगीकरन करुन कामे करावे.

या गावातील सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, नागरिक, मजूर या नागरिकांना पुणे, पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रात ये-जा करण्यास आज शनिवारी सकाळी पाचपासून मनाई केली आहे.

12 जून रात्री बारापर्यंत ही मनाई असणार आहे.  याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी काढले आहेत.  आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.