Pimpri : गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक

खंडणी-दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील मागील एक वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई खंडणी-दरोडा विरोधात पथकाने बुधवारी (दि. 23) रावेत येथे केली.

सुरज संजय कोळी (व्य 22, रा. एकविरा बिल्डिंग, वाल्हेकरवाडी, चिंचवड), आदित्य श्रीमंत कोटगी (वय 20, रा. बावधन, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्यात मागील वर्षी खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गंभीर गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार होते. खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गणेश हजारे, पोलीस नाईक आशिष बनकर यांना माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील दोन फरार आरोपी रावेत येथील राजवाडा हॉटेल जवळ थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना खंडणी दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा येथे आणून कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. पुढील कारवाईसाठी आरोपींना पिंपरी पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, गणेश हजारे, राजेंद्र शिंदे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, आशिष बनकर, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.