Pimpri : कार्यालयातून लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज- कार्यालयातून लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पिंपरीतील नेपाळी मार्केटमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

हैदर आयुब अन्सारी (वय 22), बसवराज शरणप्पा कुऱ्हाडे (वय 24, दोघेही रा. पंडित चाळ, देहूरोड) अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत.

पिंपरीतील एरिया टेक सेंटर कंपनीचे कार्यालय फोडून चोरटयांनी दोन लॅपटॉप लंपास केले होते. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी पिंपरी नेपाळी मार्केट येथे चोरीचा लॅपटॉप विण्यासाठी आले असल्याची माहिती पोलीस कर्मचारी श्रीकांत जाधव आणि अविनाश देशमुख यांना मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांनी घरफोडीचे आणखी गुन्हे केले आहेत का याबाबत पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.