BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेच्या दोन खेळाडूंची भारतीय चेसबॉक्सिंग संघात निवड

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुल धोत्रे आणि चंद्रप्रकाश यादव करणार भारताचे प्रतिनिधित्व

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- त्रिपुरा येथे सातवी राष्ट्रीय चेसबॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील दि सेवा विकास कॉपरेटिव्ह बँकेच्या दोन कर्मचारी खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या विजयामुळे दोघांची भारतीय चेसबॉक्सिंग संघात निवड झाली आहे. जुलै-ऑगस्ट मध्ये मॉस्को रशिया येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

राहुल धोत्रे यांना 90 किलो वजनी गटात तर चंद्रप्रकाश यादव यांना 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळाले. सेवा विकास कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अॅड. अमर मुलचंदानी, संचालक राजू सावंत, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरजितसिंग बासी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल शर्मा, आनंद मेमाणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रीय चेसबॉक्सिंग स्पर्धा 28 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेत दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेच्या दोन खेळाडूंनी सहभाग घेत चांगली कामगिरी केली. धोत्रे यांनी झारखंडच्या खेळाडूला चेकमेट आणि बॉक्सिंगमध्ये मात देत तर यादव यांनी केवळ चेकमेटमध्येच त्रिपुराच्या खेळाडूला मात देत सुवर्णपदक आपल्या नावावर करून घेतले. या विजयामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा गौरवाने झळकले आहे.

रशिया येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत जगभरातून 24 देश सहभागी होणार आहे. अनेक देशांमध्ये हा खेळ खेळला जात आहे. बुद्धी आणि शारीरिक ताकद या दोन्हींवर हा खेळ आधारित असल्याने खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काही वर्षात या खेळाला ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान मिळण्याची शक्यता आहे. धोत्रे आणि यादव यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.