Pimpri News : आँल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल धोत्रे

एमपीसी न्यूज – आँल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पिंपरी- चिंचवड अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे यांची निवड झाली आहे.

पोलीस  व नागरिकांचे काम, समस्या, अडचणी सोडविण्यासाठी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना काम करत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश डोंगळे, उपाध्यक्ष धर्मेंद्र आगरवाल यांनी धोत्रे यांची निवड केली आहे.

संघटनेच्या माध्यमातून पोलीस, नागरिकांची कामे, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असे काम करणार असल्याचे धोत्रे यांनी निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.