Pimpri : विश्व सिंधी सेवा संघाच्या वतीने सिंधी भाषा दिवसानिमित्त दुचाकी रॅली

एमपीसी न्यूज – जागतिक सिंधी भाषा दिवस हा 10 एप्रिलला साजरा केला जातो. त्यानिमित्त पिंपरीतील विश्व सिंधी सेवा संघाच्यावतीने दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये सिंधीबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रॅलीमध्ये विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

कुमार कृष्णा जेठानी आणि माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. रॅलीमध्ये किरण रामनानी, मनीषा करमचंदानी, पायल जेठननी. कंबन रामनानी, प्रिया सबनानी, अजित बंडवानी, मनोहर जेठवानी, जॉनी भडानी आदींनी सहभाग घेतला.

  • या सिंधी भाषा दिवसाबद्दल माहिती देताना विश्व सिंधी सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस मनोहर जेठवानी म्हणाले की, केंद्र सरकारने 10 एप्रिल 1968ला सिंधी भाषेला 16 वी भाषा म्हणून मान्यता दिली. त्यामुळे विश्व सिंधी सेवा संघाच्यावतीने हा दिवस सिंधी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गतवर्षी या मंडळाचे सिंधी भाषेच्या विकासासाठी साडेसहा कोटी रुपये दिले.

विश्व सिंधी सेवा संघ या संस्थेच्या माध्यमांतून मंडळाच्या वतीने दिलेल्या अनुदानाचा वापर भाषा संवर्धनासाठी करण्यात येतो. नीलू परेयानी या पिंपरी येथील एका खासगी शाळेत तर निकिता रामनानी या पिंपळे सौदागर येथील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांना सिंधी शिकवितात. फेब्रुवारीमध्ये निवृत्त मुख्याध्यापक रमेश मिराणी यांनीही प्रशिक्षणास सुरुवात केली. ते झुलेलाल मंदिरात शिकवितात. येथे सध्या दहा ते बारा आणि दहा ज्येष्ठ नागरिक सिंधी भाषेचे धडे गिरवितात. या शिक्षकांना मंडळातर्फे प्रतिमहिना दहा हजार रुपये मानधन दिले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.