Pimpri : रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेच्या धडकेत लोहमार्ग ओलांडणा-या इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 29) पहाटे साडेबाराच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

मृत्यू झालेल्या इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. बांधा मजबूत आहे. पाच फूट चार इंच उंची, गुलाबी टी शर्ट आणि पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. मृत इसमाच्या हातावर नागाचे चित्र गोंदलेले आहे. अशा वर्णनाच्या इसमाबाबत माहिती मिळाल्यास पिंपरी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.