-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri Vaccination News : खुशखबर ! 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे पुन्हा उद्यापासून लसीकरण सुरु होणार आहे. 18 वर्षांपुढील नागरिकांना 45 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, तर 45 वर्षांपुढील नागरिकांना 19 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. तसेच 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना दोन केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस या केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, महापालिका कन्या शाळा चिखली, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क फुलेनगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एसएस अजमेरा स्कुल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, आदिशक्ती हॉस्पिटल भोसरी, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी,कासारवाडी दवाखाना, निळु फुले नाट्यगृह सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, भाटनगर दवाखाना, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, जुने तालेरा रुग्णालय, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या 45 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे. नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या 50 टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या 50 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 19 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 19 केंद्रांवर मिळणार !

हेडगेवार जलतरण तलाव, आरटीटीसी सेंटर, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा, महापालिका शाळा खराळवाडी, दीनदयाळ शाळा पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा रहाटणी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, अश्विनी मेडिकल फाउंडेशन आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 100 च्या क्षमतेने दिला जाणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार !

कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना 100 च्या क्षमतेने दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना नवीन भोसरी रुग्णालयात 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.