Pune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती

एमपीसी न्यूज – ‘पदोन्नती’ कोणत्याही सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा व आनंदाचा क्षण असतो. अशाच प्रकारे पोलीस दलामध्ये वयाच्या विशीत पोलीस शिपाई या पदावर भरती झालेला पोलिस कर्मचारी व त्याचा सेवानिवृत्ती पर्यंत 24 तास कर्तव्यावर असतो. अशाच वर्षानुवर्षे पुणे पोलीस दलात काम करणाऱ्या 575 पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार शहर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार दर्जाचे पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली. यासाठी पोलीस आयुक्त प्रशासन डॉक्टर जालींदर सुपेकर, पोलीस उपायुक्त मुख्यालय स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण आणि प्रशासकीय अधिकारी शशिकला भालचीम यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीने पदोन्नतीची ही ऑर्डर आज जाहीर केली.

यामध्ये 200 पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस फौजदार या पदावर, 249 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर तर 126 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यापूर्वी याच वर्षे फेब्रुवारी एप्रिल मध्ये शहर पोलीस दलातील 172 आमदारांना पदोन्नती देण्यात आली होती. कोविड 19 मुळे ही पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि इतर अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.