Pimpri : नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या पोलिसांच्या गाडीवर कारवाई होणार का?

एमीपीसी न्यूज – सामान्य नागरिकांना (Pimpri) कायद्याचे वळण किंवा धाक दाखवणारे पोलीस आता स्वतःच नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करतात, त्यांच्या या गाडीवर नियमानुसार कारवाई होणार का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी पोलीस प्रशासनाला विचारला आहे.

दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथे नकळतपणे गाडी नो पार्किंगमध्ये पार्क केली तर कोणतीही पुर्वकल्पना न देता गाडीवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्याच पिंपरीतील साई चौकात नो पार्किंगमध्ये पोलिसांची गाडी थोडी-थोडकावेळ नाही तर तब्बल काही तास थांबली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

Pune : संस्कारक्षम, समाजाभिमुख माणूस घडविण्याची गरज – अश्विनी शेवाळे

जो न्याय सर्व सामान्यांना असतो तोच पोलिसांना असणार का, कायद्याचेच (Pimpri) रक्षक कायदा मोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल प्रदिप नाईक यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.