_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Dabhad : हरण्येश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने हरण्येश्वर टेकडीवर वृक्षारोपण

0

एमपीसी न्यूज : पर्यावरण सप्ताह निमित्ताने गुरूवार (दि 10) तळेगाव शहर शिवसेनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र नवले व हरण्येश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने हरण्येश्वर टेकडी परिसरात वड, पिंपळ व आंबा या देशी वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भास्कर जाधव व पोलीस निरिक्षक शहाजी पवार यांचे हस्ते वृक्षलागवड शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कोरोना कालावधीतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल संयोजकांचे वतीने भास्कर जाधव व शहाजी पवार यांचा सत्कार राजेंद्र नवले व भाऊसाहेब गायकवाड यांचे हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास संभाजी भालेकर,रोहन काटे,विलास पाटील,नारायण आसवले,  स्वप्नील खाकाळ,रामप्रवेश यादव, रुपेश बालघरे,संतोष तळेकर,राहुल टिळेकर,हर्षवर्धन पवार, आतिष कडलक,मयूर वानखेडे,किशोर निघोजकर, प्रथमेश शिंदे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment