PMC : रस्त्यांच्या देखभालीकडे पीएमसीचे दुर्लक्ष, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

एमपीसी न्यूज : पीएमसीने पुण्यातील रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती (PMC) आणि शास्त्रीय पद्धतीने योग्य बांधकाम करण्यात दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कनीज-ए-फातेमाह सुखरानी आणि पुष्कर कुलकर्णी या दोन याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. 2023 चा 88 (सेंट क्र. 10739), कनीज-ए-फातेमाह सुखरानी आणि पुष्कर कुलकर्णी या दोन याचिकाकर्त्यांन पुणे महानगरपालिका (PMC), महाराष्ट्र राज्य नगरविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध दाखल केली.

बेजबाबदारपणे केलेल्या रस्त्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण निर्माण होत असून डासांची पैदास होऊन नव्या रोगांचा प्रसार होत आहे.

Chinchwad : शहरात गुरुवारपासून फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला

याचिकाकर्त्यांनी या विरोधात प्रश्नांची मालिका तयार केली असून (PMC) सत्य उघड करणारी छायाचित्रे देखील दिली आहेत. हे प्रश्न आणि छायाचित्रे त्यांनी मे 2022 पासून पीएमसी आयुक्त आणि राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवली आहेत.

पुण्यातील रस्त्यांची दुरुस्ती, देखभाल आणि शास्त्रीय पद्धतीने बांधकाम करण्यासाठी STAC आणि RDRMC अहवाल लागू करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.