Chinchwad : शहरात गुरुवारपासून फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज –  जयभवानी तरुण मंडळ, मोहननगर आयोजित (Chinchwad) सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला गुरुवार 11 ते 16 मे 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत  व्याख्यान होणार आहे.

11 मे रोजी सुप्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख ‘आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफतील. 12 मे रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना : आजचे सामाजिक, राजकीय वास्तव!’ या विषयावर विचार मांडतील.  13 मे रोजी सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी ‘भारताच्या राजकारणाची दशा व दिशा’ या विषयाच्या माध्यमातून तृतीय पुष्पाची गुंफण करतील.

14 मे रोजी इतिहासतज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे छत्रपती शिवाजीमहाराज : वर्तमानातील आव्हाने!’ या विषयावर चतुर्थ पुष्प गुंफणार आहेत. 15 मे रोजी ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू ‘अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस?’ या विषयावर भारुडांच्या माध्यमातून ‘जगण्याचे अंतिम सत्य!’ मांडतील. व्याख्यानमालेतील अंतिम पुष्प 16 मे रोजी सुप्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे – पाटील ‘छत्रपती संभाजीमहाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयाने गुंफणार आहेत.

Pimpri : मानवी वस्तीत धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक

विनाशुल्क असलेल्या या सर्व व्याख्यानांचा लाभ सर्व नागरिकांनी (Chinchwad) आवर्जून घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.