PMC Schools reopen: पालकांचे संमतीपत्र अत्यल्प आल्यास 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार नाही : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज : येत्या 4 जानेवारी पासून महापालिकेच्या नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. परंतु पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्रे अत्यल्प असल्यास शाळा बंद ठेवल्या जातील, शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

सध्या युरोप खंडात, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणुंचा नवा स्ट्रेनने मृत्यूचे थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) आदेश लागू आहेत. तसेच भारतामध्ये नव्या स्ट्रेन कोरोना विषाणुंचे सहा रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे देखील आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक केले आहे.

शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत. परंतु समंतीपत्रांच्या संख्येवर शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभुमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संमतीपत्रे कमी आल्या तर शाळा महाविद्यालये सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.