Pune : पुण्यात झिका व्हायरसचा प्रसार; विशेष टास्क फोर्ससाठी मुरलीधर मोहोळ यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिका (Pune) हद्दीत झिका विषाणूचे रुग्ण आढळत असल्याचे स्पष्ट झाले असून झिका व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्याची मागणी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटले आहे, की त्यावर उपाययोजनांची दिशा ठरवण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती करणे आवश्यक आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूची पार्श्वभूमी पाहता, यावर योग्यवेळी आवर घालणे आणि नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.

Pune : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

येरवडा येथील प्रतीकनगर येथे राहणाऱ्या 64 वर्षीय महिलेला झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे बाधित (Pune) भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स नियुक्त करावी. यासोबतच या संसर्गजन्य विषाणूसंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्या.

सदर विषय गांभीर्याने घेऊन याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी विनंतीही मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.