Pune : गुन्ह्यातील तपास न करण्यासाठी 12 हजारांची लाच घेताना पोलीस नाईक जाळ्यात

एमपीसी न्यूज – संगनमताने 12 हजारांच्या लाचेची मागणी करणा-या खाजगी वकिलाला व पोलीस नाईकास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. 

याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. आरोपी पोलीस नाईक पांडुरंग रंगनाथ गोरवे (वय 35, रा. श्रीराम नगर,बारामती) व खाजगी वकील सचीन बलभीम सोनटक्के (वय 35, रा. मुक्काम जंक्शन, इंदापूर ) अशी लाच स्वीकारणा-या आरोपींची नावे आहेत. काल सोमवारी (दि.15) 12 हजारांची मागणी केली होती. आज मंगळवारी (दि.16) 12 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे चुलत्याविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करणे तसेच या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न न करण्यासाठी पांडुरंग गोरवे यांनी तक्रारदार यांचेकडे काल सोमवारी (दि.15) 12 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर पांडुरंग गोरवे यांनी वकील सचिन सोनटक्के यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज मंगळवारी (दि.16) तक्रारदार हे खाजगी वकील सचीन सोनटक्के यांना भेटले असता त्यांनी पांडुरंग यांच्यासाठी 12 हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली व पांडुरंग यांना रक्कम मिळाली असल्याचे कळविताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.