Chinchwad News : पोस्टमन नंदकुमार वाडेकर 42 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

एमपीसी न्यूज – पोस्टमन नंदकुमार मधुकर वाडेकर यांनी 42 वर्ष टपाल खात्यात सेवा दिली. 31 मार्च 2022 रोजी त्यांचा चिंचवड पूर्व टपाल कार्यालय येथे निवृत्तीचा कार्यक्रम पार पडला.

पोस्टमास्तर रमेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमासाठी नॅशनल युनियनचे प्रतिनिधी काळूराम पारखी, देवदास देवकर, भरत बागडे, दीपक गायकवाड, अलिम महालदार, अशोक अवघडे, सुयोग तटकरे, मिलिंद गोरड, अश्विनी मांडवगणे, सुवर्णा मदने, मंदा डोळस, सहाय्यक पोस्टमास्तर तसेच पिंपरी चिंचवड मधील बहुसंख्य टपाल कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी वाडेकर यांचा नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज पोस्टमन व मल्टी टास्किंग स्टाफ या संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. वाडेकर हे पिंपरी चिंचवड विभागात वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आऊट सायडर 10 वर्षे, ग्रामीण डाकसेवक म्हणून 7 वर्ष, ग्रुप डी मध्ये 20 वर्षे, व यामधून परीक्षा देऊन पोस्टमन म्हणून 5 वर्षे अशी एकूण 42 वर्षे टपाल खात्यात प्रामाणिकपणे कार्यरत होते. 31 मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक सांगडे यांनी केले. जयदेव थोरात यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.