Chinchwad : प्रयास ग्रुपच्या वतीने चैत्रफुलोरा स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात 

एमपीसी  न्यूज – चिंचवड येथील  प्रयास ग्रुप महिलांचे खुले व्यासपीठच्यावतीने स्वच्छंदी चैत्रफुलोरां स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आला.  

ग्रुपच्या अध्यक्षा शोभा निसळ म्हणाल्या की,  महिला आपुलें दैनंदिन कामकाज सांभाळूंन स्वत:साठी वेळ कांढून सामाजिक परंपरा, जातीय सलोखा, या गोष्टींचा स्वच्छंदपणें जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकारात्मक विचार, महिला सबलीकरण, व महिला सक्षमीकरणं, आत्मविश्वास या त्रिसुत्रींचा ताळमेळ साधूंन कुटुंबाचा व समाजाचा विकास साधू शकतात. त्यासाठी त्यांनी स्वच्छंदी राहूंन खुले व्यासपीठ मिळवांवे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात.

यावेळी या उत्सवाचे स्वरूप चैत्रागौर हळदीकुंकू न करतां “ चैत्रफुलोरां स्नेहमिलनं “ असे असांवे. कारण हळदीकुंकू या शब्दांमुळें कांही महिला सहभाग घेऊं शकत नाहीत. परंतु स्नेहमिलनं शब्दांमुळें त्या स्वखुशीनें सहभागी होतांत. या भावनेतूंन ही संकल्पना साकार  झाली. स्त्री सुलभ दैनंदीन जिवनाशी निगडीत आेव्यां, भक्तीगीते, वसंतउत्सव गीते, नृत्यें, भारूंड, उखांणे, लोकसंगीत विवीध भावछटांनी सादर केले. मनोरंजक गमतीदांर गेम शोचा आनंद महिलांनी लुटला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी कवी यांनी केले.  कार्यक्रमासाठी नियोजन अनिता पाठक, सुनेत्रा देशपांडे, सुनिता किवडें, सुरेखा लोरेकर, रेखा क्षिरसागर, आशा पुरकर, दिपाली खासनीस, शैला वडापूरकर, स्वाती जोशी,सविता कुलकर्णी, गायत्री पेंढारकर , ज्योती बावळें यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.