‘बबन’च्या कलाकारांचे पिंपरीत भव्य स्वागत…..

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट‘बबन’चा शुक्रवारी पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर चित्रपटगृहात प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता.

यावेळी दिग्दर्शक क-हाडे व चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. शरदनगर चिखली येथून विशाल ई-स्क्वेअर पर्यंत या कलाकारांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये कलाकार भाऊसाहेब शिंदे, अभिनेत्री शीतल चव्हाण, गायत्री जाधव, देवेंद्र गायकवाड, अभय चव्हाण, योगेश डिंबळे, पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकार जान्हवी कांबीकर, स्वप्निल पटेकर, नितीन वाघ सहभागी झाले होते. प्रिमियर शो ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

"Baban

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.