Election news : चार सदस्यांचा प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुकीची तयारी करा : उज्ज्वल केसकर

एमपीसी न्यूज – चार सदस्य प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुकीची तयारी आणि अधिसूचना जाहीर करणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तीन सदस्याच्या प्रभागाला आव्हान देणारी याचिका देणाऱ्याने काढून घेतली. आता लवकरात लवकर प्रशासन राज संपवणे गरजेचे आहे, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात आपण 4/8/22 रोजी केलेल्या अधिसूचनेला आणि विधिमंडळाची परित केलेल्या 4 सदस्य प्रभाग रचना आणि मुंबई साठी पूर्वी इतकी सदस्य संख्या याला आवाहन देणारी याचिका याचिकाकर्त्यानी सुप्रीम कोर्टात मागे घेतली. त्याबाबत मे हायकोर्टात दाद मागण्याचे स्टेटमेंट देऊन याचिका मागे घेतली. नगरविकास विभागाने 4 सदस्य प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात अस्तित्वातील 4 सदस्य प्रभाग रचना अंतिम आहे. त्याची अधिसूचना काढण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.